सर्वात महत्वाचे आहे - स्ट्रॉंग फाउंडेशन, स्ट्रॉंग बेस, मजबूत पाया. जेवढा पाया मजबूत तेवढी मोठी इमारत त्यावर उभी राहील आणि टिकेलही. Tall buildings need strong foundation! पाया कच्चा असेल आणि भलीमोठी इमारत बांधली किवा बांधण्याचा आव आणला तरी ती इमारत टिकणार नाहीच. महाराष्ट्रा काय, भारत काय - अनेक जाती धर्माणी बनलेला देश आहे. त्यात गरीब आहेत, श्रीमंत आहेत, आपल्यासारखे IT वाले आहेत. त्यामुळे ह्या सर्व घटकातील सामान्य माणसाला (common man) सोबत घेऊन जाणारा पक्षच मोठा होईल आणि टिकेलही.
पण मित्रहो, सगळ्यात महत्वाचे काय आहे, माहीत आहे? एखादा विशिष्ट घटकला पकडून न राहता, या सर्व घटकातील सामन्य माणसाला सोबत घेऊन पुढे जायचे झाल्यास खूप काळ जावा लागेल. किमान ७-८ वर्षे प्रामाणिकपणे common man च्या हितासाठी कुठल्याही राजकिय मतलाबाच्या आहारी न जाता प्रयत्न करावा लागेल. एवढा वेळ वाट पाहायची, हे तर केवळ अशक्य!! इथे तर, उद्या फार लांब आहे असे या पुढारी लोकाना वाटते. बीजेपीचा अनेक वर्षापूर्वी हाच प्रॉब्लेम होता. त्यांनी शॉर्टकट अवलंबला.
सत्ता मिळाली, बिल्डिंग उभी राहिली, पण टिकली नाही. कारण एकच - सर्व घटकातील सामान्य माणूस सोबत नाही.
आता बहुतेक, बीजेपीला या यक्षप्रश्नाची जाणीव झाली असावी?
पण जी भलीमोठी बिल्डिंग उभी आहे किवा तसा भास निर्माण झाला त्याचे काय करायचे? पायाच कच्चा राहिला त्याचे काय करायचे?
तुम्हाला काय वाटतं ................................??
Subscribe to:
Post Comments (Atom)
'Moral Reinforcement' is the only solution.
ReplyDeleteMany a time, it is erroneously claimed that the leadership should be handed over to youth. I sincerely feel that age, appearance and physical strength should not be the criteria of selecting a leader. His non-faltering belief on principles, his tenderness at heart, his intelligence and above all his commitment to uplift the poor, should be the consideration for his selection. Else, next time we will have to keenly observe the WWF fights to choose our next leader. Yes, even the defeated participant there, is very young and energetic.
Ravindra Desai